Saturday, November 23, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

Share

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह (WaghNakh) शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा असं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यावेळी म्हणाले.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, “लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकविला. त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. शिवराज्यातील ठिकाणांचे सर्किट निर्माण करावे. कोणत्याही वादविवादाला वाव राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अधिकृत शिवचरित्र प्रकाशित करावे. देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद शिवचरित्रात आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख