मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरून घेरलं आहे. पुतळ्याचा दर्जा निकृष्ट होता, अशा प्रकारचा पुतळा सरकारने उभा केलाच कसा काय? असा प्रकारचे प्रश्न विरोधक विचारत आहेत. यावर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच सुनावलं आहे. ते म्हणाले कि, “यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे” अशी टीका त्यांनी केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. सगळ्यांनाच वेदना झाल्या आहेत. यावर कोणीही राजकारण करु नये. महाराष्ट्र सरकारने पुतळा उभारला नव्हता तर नौदलाने उभारला होता. ज्यांना हे काम देण्यात आलं त्यांना कदाचित इतक्या वेगाने तिथे वारे वाहतात याचं आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी आम्ही नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
- “तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!
- प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात!
- राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल
- पुस्तक परिचय: Leadership: Six Studies in World Strategy