चिखलदरा नगर पालिका निवडणुक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा (जिल्हा अमरावती) येथील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा
आल्हाद कलोती यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, आल्हाद कलोती हे चिखलदरा येथील सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय राहिले आहेत. त्यांची उमेदवारी ही त्यांच्या स्थानिक जनसंपर्कावर आधारित असली तरी, त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आल्हाद कलोती यांचा निवडणुकीत प्रवेशामुळे आता येथील लढत अधिक रोमहर्षक होणार आहे.