नागपूर : दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरच्या रामगिरी येथील शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती “सुशासन दिन” म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पटलावर आपली ओळख निर्माण केली. त्यांचे योगदान नेहमीच देशवासीयांसाठी प्रेरणादायी राहील