Tuesday, December 3, 2024

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

Share

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली.

पालघर लोकसभा (Palghar Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा (Dr Hemant Savara) यांच्या प्रचारासाठी वसईत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. “तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले होते. त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारने आरोपींना पाठिशी घालून न्याय दिला नाही. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर एकाही साधू संतांना हात लावण्याची हिंमत कोणी करू शकले नाही”, असे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख