Saturday, September 21, 2024

कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Share

मुंबई : “कृषी महाविद्यालयांना (College of Agriculture) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल,” असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 116 वी बैठक मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी परिषदेतील संचालक डॉ.हरिहर कौसडीकर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परिषदेचे सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, कृषी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठांनी आवश्यकतेनुसार सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीमध्ये एकूण ५४ विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षण विभाग, संशोधन विभाग, विस्तार शिक्षण व साधनसामग्री विकास विभाग आणि प्रशासन या विषयासोबतच कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या प्रलंबित विषयांवरही चर्चा करण्यात आली.

अन्य लेख

संबंधित लेख