Friday, December 27, 2024

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल?

Share

महाकुंभ : महाकुंभाचे (Mahakumbh) आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ऋषी-मुनी या महान सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदाचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू होत आहे आणि २६ फेब्रुवारी रोजी सांगता होईल. प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभाला विशेष महत्त्व आहे कारण प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हा संगम जगभर प्रसिद्ध आहे.

मागच्या भागात आपण पवित्र मेळ्याची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेली आहे, विशेषत: समुद्र मंथन (समुद्र मंथन), जे देव आणि दानव “अमृत” मिळविण्यासाठी झाले होते हे बघितले. या भागात आपण कुंभमेळ्याचे प्रकार जाणून घेणार आहोत.

कुंभमेळ्याचे (kumbh Mela) आयोजन प्राचीन काळापासून केले जात आहे, परंतु या मेळ्याचा पहिला लिखित पुरावा महान बौद्ध यात्रेकरू ह्युएन त्सांग यांच्या लिखाणातून मिळतो, ज्यामध्ये सहाव्या शतकात सम्राट हर्षवर्धनच्या काळात झालेल्या कुंभमेळ्याचे प्रसंगोपात वर्णन केले आहे. कुंभमेळा चार ठिकाणी आयोजित केला जातो – हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन.

३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराजमधील गंगा आणि यमुना यांच्या संगमावर महाकुंभ २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. ४५ दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीत एकूण सहा शाही स्नान होणार आहे. यावेळी महाकुंभात देश-विदेशातील ४० कोटींहून अधिक लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. २०१९ मधे प्रयागराज येथे शेवटचा अर्धकुंभ मेळा पार पडला होता. तर यापूर्वी २०१३ मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. तर हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

वास्तविक, कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत – कुंभ, अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ. सर्व कुंभमेळे ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जातात. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी वर्षातील वेळही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक कुंभमेळ्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते.

महाकुंभ

दर १४४ वर्षांनी केवळ प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, एकूण १२ कुंभांपैकी चार कुंभ पृथ्वीवर आयोजित केले जातात आणि उर्वरित आठ देवलोकात आयोजित केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य, चंद्र आणि गुरु एका विशिष्ट स्थितीत असतात. मग या ठिकाणी मेळ्यांचे आयोजन केले जाते. प्रयागराजमध्ये १४४ वर्षांतून एकदा महाकुंभ मेळा भरतो. असे मानले जाते की, महाकुंभमधे देव शाही स्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यामुळे शाही स्नानाचे महत्त्व अधिक आहे

पूर्ण कुंभमेळा : दर १२ वर्षांनी येतो. प्रामुख्याने भारतातील चार कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे आयोजित केले जातात. ते या चार ठिकाणी दर १२ वर्षांनी फिरते.

अर्ध कुंभ : अर्ध कुंभ हा दर सहा वर्षांनी साजरा केला जातो. अर्धकुंभचे आयोजन प्रयागराज आणि हरिद्वार या दोनच ठिकाणी केले जाते. अर्ध म्हणजे अर्धा. त्यामुळे सहा वर्षांनी त्याचे आयोजन केले जाते.

सिंहस्थ कुंभा : सिंहस्थ कुंभाचे आयोजन खास नाशिक आणि उज्जैन येथे केले जाते. ज्योतिषशास्त्रात सिंहस्थ कुंभ सिंह राशीशी संबंधित आहे. या ठिकाणी सिंहस्थ कुंभाचे आयोजन तेव्हाच केले जाते जेव्हा गुरु सिंह राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो.

माघ कुंभ मेळा : याला मिनी कुंभ मेळा असेही म्हणतात जो दरवर्षी आणि फक्त प्रयागराज येथे भरतो. हे हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात आयोजित केले जाते.

कुंभमेळ्याचे ठिकाण सूर्य, चंद्र आणि गुरु या काळात वेगवेगळ्या राशींमध्ये धारण केलेल्या स्थितीनुसार ठरवले जाते.

महाकुंभमेळा केव्हा आणि कसा आयोजित केला जातो?

प्रयागराज

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते. सध्या गुरु याच राशीत आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो.

हरिद्वार

सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

नाशिक

गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात, तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उज्जैन

सूर्य ग्रह मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह सिंह राशीमध्ये असताना, सूर्य देवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

कुंभ आणि महाकुंभ यातील फरक जाणून घ्या

उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर ६ वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. तर पूर्ण कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा आयोजित केला जातो, जो प्रयागराजमध्ये होतो. १२ कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, याआधी २०१३ साली प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.

अन्य लेख

संबंधित लेख