Wednesday, November 13, 2024

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात

Share

विविध मतदारसंघात विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले जात आहे.
प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे विधानसभेचे मैदान आता काही दिवसांवर आहे. स्टार प्रचारक आपली शक्ती कामाला लावत आहेत.  

साताऱ्यात कोरेगाव इथं शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली.

https://x.com/mieknathshinde/status/1853755662125428939

भंडारा विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी विविध ठिकाणी पूजा करत प्रचाराला सुरुवात केली.

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे हे देखील नागपूर इथं जनआशीर्वाद यात्रा काढून प्रचाराची सुरुवात करत आहेत. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ही यात्रा सुरु होईल. नागपूर उत्तर मतदारसंघाचे आमदार डॉ. नितीन राऊत देखील आज शहराच्या विविध भागात प्रचार करत आहेत. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी देवरी तालुक्यात हरदोली गावातून प्रचाराला सुरवात केली आहे.

अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर यांचं पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरुद्ध त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं.

अन्य लेख

संबंधित लेख