Saturday, December 21, 2024

विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबरला, राम शिंदे महायुतीचे उमेदवार

Share

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत आणि जयकुमार रावल यांचीही उपस्थिती होती. विधानपरिषदेचे सभापतीपद मागील २९ महिन्यांपासून रिक्त होते. १९ डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे.

राम शिंदे यांच्या उमेदवारीमुळे सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपने आपली ताकद दाखवण्याचे ठरवले आहे. यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रा. शिंदे यांना शुभेच्छा देत विश्वास व्यक्त केला की त्यांचे नेतृत्व विधान परिषदेच्या कामकाजासाठी महत्त्वाचे ठरेल. विधान परिषदेच्या सभापती पदाला मोठे महत्त्व आहे, कारण ते सभागृहातील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आणि सर्व सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी जबाबदार असतात. उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदेगटाकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र विधानपरिषदेतील संख्याबळाच्या आधारावर प्रा. शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख