सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावामुळे महाराष्ट्रात धार्मिक संघर्ष सुरु झाला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्च्यात रामगिरी महाराज्यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा मात्र भडक दिल्या गेल्या. तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केली गेली. आणि तीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर.या उग्र घोषणांमुळे मुळे हिंदू समाज्याच्या भावना दुखावल्या आहेत आणि सार्वजनिक शांततेचा भंग करुन समाजामध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार होता. समाजात अशांतता निर्माण करण्याच्या त्या घोषणा होत्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या धार्मिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, रामगिरी महाराजांविरोधात उठलेल्या ‘सर तन से जुदा’ फतव्याने राज्यभरात तणाव निर्माण केला आहे. हा फतवा रामगिरी महाराजांच्या एका भाषणानंतर उद्भवला, जिथे त्यांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावर टीका केल्याचा आरोप करण्यात आला.
रामगिरी महाराजांच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी जे काही म्हटले होते ते त्यांच्या धर्मग्रंथांपासून प्रेरणा घेतलेले होते, परंतु या घटनेबद्दल बोलताना काही टीकाकारांनी त्यात विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. इस्लामवादी समूहांनी आणि काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे सामाजिक भावानांच्या विरोधात जाणारे कृत्ये वाढली आहेत. ‘सर तन से जुदा’ हा नारा फक्त एका विशिष्ट धर्माच्या लोकांना धमकी देण्याचा नाही, तर हा समाजाच्या संपूर्ण सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करतो.
रामगिरी महाराजांनी जे काही म्हटले होते त्याचा संदर्भ बदलून दाखवण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे समाजात तणाव निर्माण झाला. हे प्रकरण केवळ रामगिरी महाराजांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न नाही, तर हा सर्वसामान्य नागरिकांच्या मतप्रकट करण्याच्या स्वातंत्र्यावरही प्रश्न उपस्थित करतो.
महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणावर कार्यवाही करण्याची गरज आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या हिंसक आणि विभाजक विचारांना थांबवता येईल. सर्वांनी मिळून समाजातील समतोल राखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण ‘सर तन से जुदा’ हा नारा फक्त एका व्यक्तीविरोधात नाही, तर समाजाच्या संपूर्ण सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करतो.
दरम्यान या मोर्च्यात सहभागी झालेल्या काही जणांची ओळख पटली आहे. त्यांची पोलिसांकडून आता चौकशी सुरु होणार आहे.