Wednesday, December 17, 2025

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले

Share

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरच्या आसपास सर्वात मोठा राजकीय भूकंप घडेल, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश’ झाला असल्याचा खोचक टोला लगावला.

चव्हाण यांच्या मते, हा बदल अमेरिकेतील ‘एपस्टाईन फाईल्स’ (Epstein Files) प्रकरणाशी जोडलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे होऊ शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पंतप्रधानपद काँग्रेसकडे येणार नाही; त्याऐवजी भाजपमधूनच एखादा मराठी माणूस पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला, “पृथ्वीराज चव्हाण यांचा थोडा बुद्धिभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही बोलण्याची सवय लागली आहे. कुठे पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतात, कोण जाणार, कोण येणार, आता जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते पृथ्वीराज चव्हाण हे झाले आहेत, असे मला वाटते,” असा टोला सुद्धा लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख