Thursday, December 5, 2024

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

Share

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्व
राज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या
बैठकीत लोखंड, पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू
करण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या
प्लॅटफॉर्म तिकिटं, विश्रामगृह, प्रतीक्षालयं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला
जाऊ नये अशीही शिफारस या परिषदेनं केली होती.

अन्य लेख

संबंधित लेख