हलबा समाजातील युवक व युवतीसाठी व्यावसायिकरण व स्वयंरोजगार या विषयावर काल दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी मा.डॉ.श्री.उदय निरगुडकर व त्याच सोबत अनेक जेष्ठ उद्योजक व सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये आयुक्त – वस्त्रोद्योग विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रोमोद्योग आयोग व विविध शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन समाजातील युवक-युवतींना लाभले. नंदगिरी रोड समाज भवन येथे कार्यक्रम यशश्वीरीत्या पार पडला.
हलबा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज आहे, हलबा समाजातील अनेक युवक – युवती येणाऱ्या काळात भारतातील मोठे उद्योजक व्हावेत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हलबा समाजातील युवक व युवती मोठ्या संखेने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. समाजातून नक्कीच मोठ्या प्रमाणात उद्योजक घडतील असा आत्मविश्वास सर्वच श्रोत्यांना आला.