Saturday, July 27, 2024

`कळस आणि तुळस’ हवी असेल, तर मतदान अनिवार्य

Share

आत्मग्लानी झटकून हिंदू मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बाजवलेच पाहिजे. अन्यथा भविष्य काळ आणि नजीकचा वर्तमान क्षमा करणार नाही. ३७० कलम आणि राम मंदिर हे प्रवासातील टप्पे आहेत. Destination नाही, याचे भान हिंदू समाजाने ठेवणे अत्यावश्यक.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी पुण्यात सध्या मुस्लिम वस्त्यांमधून निघत असलेल्या फतव्यांचा समाचार घेत मतदारांना ‘हिंदूंचे मोहोळ’ उठू द्या असे आवाहन केले आहे. ठाकरे यांनी एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. सध्या पुण्यात काॅंग्रेससचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे एक भाषण समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाले असून त्याची दखल राष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेतली गेली आहे. या भाषणात हिरोली यांनी पुणे जिलहायतील चार मतदारसंघातील भाजपविरोधी उमेदवारांची नावे घेऊन त्यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील पूर्व भागात मुस्लिम वस्ती आहे. या भागात सध्या राजकीय वातावरण तप्त असल्याचे दिसून येते. शिवसेना, मनसे आणि काॅंग्रेस असा प्रवास करून आलेले रवींद्र धंगेकर यांचा प्रचार येथे जोरात सुरू असल्याचे दिसून येते.

All India Jamiat Ulema e Hind या संस्थेच्यावतीने हिरोली भाजपविरोधी प्रचार करताना दिसतात. ही संस्था काय आहे? या संस्थेची स्थापना १९१९ मधे झाली. इस्लामी विचारवंतांची ही संस्था मानली जाते. या संस्थेचा मुस्लिम समाजावर प्रभाव मानला जातो आणि तिचे जाळे देशभर पसरले आहे. ‘धर्मनिरपेक्षता टिकवायची असेल तर भाजपविरोधी मतदान करणे कर्तव्य असल्याचे’ हिरोली सांगतात.

यापूर्वी हिरोली यांनी कसबा पोटनिवडणुकच्यावेळी वादग्रस्त विधाने केली होती. ‘मृत मुस्लिमांनासुद्धा मतदान करायला बोलवा’ असे आवाहन केले होते. हिरोली आणि त्यांच्यासारखे मुस्लिम नेते एवढे उतावीळ आणि आक्रमक का झाले याचेही उत्तर राज ठाकरे यांनीच दिले आहे. गेल्या दहा वर्षात या मंडळीना डोके वर काढायला संधी मिळाली नाही, म्हणून ते आक्रमक झाल्याचे ठाकरे सांगतात.

प्रश्न असा आहे की अयोध्येतील राम मंदिर प्रसंगी दाखविलेली जागरूकता हिंदू समाजामध्ये आहे का? पुण्यासारखेच वातावरण देशामध्ये अन्य भागातसुद्धा आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघ आणि मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा दिसत होत्या तर हिंदू समाजामध्ये मतदानाबद्दल उदासीनता होती.

आसाममधे धुबरी हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. २०२४ च्या म्हणजेच सध्याच्या निवडणुकीत या मतदारसंघात ९२.१ % मतदान झाले आहे. २०१९ मधे ही आकडेवारी ९०.६६ % होती तर २०१४ मधे ८८.३६ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. थोडक्यात गेल्या तीन निवडणुकांमधे धुबरीमधे मतदानाची टक्केवारी वाढतच आहे.

खरा गंभीर प्रकार आता वाचा. धुबरीमधे मुस्लिम लोकसंख्या ७९. ७ % आहे. हिंदू लोकसंख्या फक्त १९.९ % आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत मतदान करण्याचा हक्क सोडत नाही. अर्थात हा समाज कोणाला मतदान करतो, हे सांगण्याची गरज नाही, राहुल गांधी यांनी या मतदारसंघात एक रोड शो केला होता, एवढे पुरेसे आहे.

या उलट गुजरातमधील अमरेली मतदारसंघाचे उदाहरण घेऊ. या ठिकाणी हिंदू लोकसंख्या ९३.१ % आहे. मुस्लिम लोकसंख्या ६.५ % आहे. मात्र या ठिकाणी केवळ ४९.५ % मतदान झाले. देशातील हे सर्वात कमी मतदान मानले जाते.

देशभरात अशीच अवस्था कमी अधिक प्रमाणात दिसून येते. हिंदू मतदारांमधे उदासीनता तर मुस्लिम समाजामध्ये उत्साह. बिहारमधे अनेक ठिकाणी रात्र झाली तरी लांबचलांब रांगा अनेक केंद्रांवर दिसत होत्या. हे अर्थातच मुस्लिमबहुल वस्त्यांमधील चित्र आहे. मुस्लिम समाज मतदानाकडे धार्मिक कर्तव्य म्हणूनच पाहतो. व्होट जिहादची भाषा कशामुळे येते?

या उलट हिंदूमधे प्रचंड निष्काळजीपणा आणि उदासीनता दिसून येते. हिंदू समाजामधील एक फार मोठा वर्ग राजकारणाबाबत त्रागा आणि रागाने बोलतो. प्रसंगी राजकारणाला शिव्या घालणे, ही एक fashion बनली असून ते एक बौद्धिक परिपक्वतेचे लक्षण मानले जाते. वास्तविक हा एक आत्मघाताचा उत्तम नमुना आहे. मतदानाकडे पाठ फिरवणे हा नागरी कर्तव्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. हीच मंडळी नंतर देशातील समस्यांवर तावातावाने निष्फळ चर्चा करताना दिसतात. मतदान हा वैयक्तिक विषय असला तरी त्याचे प्रकटीकरण सामूहिक असते. केरळमधील अनेक नागरिक नोकरीनिमित्त आखाती देशात आहेत. त्यात मुस्लिम समाजाचा भरणा जास्त आहे. या वर्षी आखाती देशातील अनेक मुस्लिम मतदार chartered flight करून मतदानासाठी आले होते. या उलट हिंदू समाज काही अंतरावरच्या मतदान केंद्राकडे जात नाही.

ही उदासीनता अत्यंत गंभीर आहे. त्यांची गंभीर किंमत मोजावी लागेल. आज मुस्लिमांकडून मतदानाचा फतवा निघतो. उद्या तो कशाविषयीसुद्धा असू शकतो. Vote Jihad चे गांभीर्य वेळीच समजून घेणे आवश्यक. हिंदू आत्मग्लानीमधे गेले आहेत. हिंदू मतदारांची सध्याची अवस्था hibernation सारखी झाली आहे. परंतु hibernation ही अवस्था बाह्य वातावरणापासून बचाव करण्यासाठी असते. देशाचे सजग नागरिक म्हणून हिंदू समाजाला बाह्य वातावरणापासून गुहेत लपून चालणार नाही. ३७० आणि राम मंदिर हा केवळ प्रारंभ आहे. Destination नाही. हिंदू यांचे भान ठेवतील का?

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख