Friday, November 1, 2024

बांगलादेशी हिंदूंची कमाल

Share

बांगलादेश या मुस्लिम देशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंनी कमाल केली. एकत्र आले, मोर्चा काढला व पूजेची परवानगी व दोन दिवस सुट्टीही मिळवली.

ज्या बांगलादेशात हिंदू आहे हे फक्त म्हणणे म्हणजे सुळावरची पोळी होती त्या ठिकाणचा हिंदू स्वतः च्या धार्मिक मागणीसाठी रस्त्यावर उतरला.व जिंकला सुध्दा. अभिनंदन बांगाला देशी हिंदू समाजाचे. पण हे असे का घडले?

हिंदू जागा व संघटित झाला हे एक कारण. पण अजूनही एक महत्त्वाचे कारण आहे. भारतातील हिंदू हित रक्षक केंद्र सरकार. आज पर्यंत दुस-या देशातील हिंदु हे पोरके होते कारण आधीच्या भारतीय सरकारांना निधर्मी वादाची अब्रू न झाकणारी वस्त्रे सांभाळणे हे मानवतेच्या भावनने हिंदू हित रक्षणा पेक्षा अधिक मोलाचे होते.

पण २०१४ पासून केंद्र सरकार आले जे जगभरातील हिंदू जनतेसाठी सुरक्षा कवच बनून आले. कोठेही हिंदूंना मानवतेपासून पारखे ठेवायचा प्रयत्न झाला तर भारत त्या हिंदूला पोरके सोडणार नाही हे जगाला स्पष्ट करून सांगितले. म्हणून बांगलादेशी सरकारला व शेफारलेल्या जमाती तरुणांना याची धग समजली. बांगलादेशच्या हिंदूंना हात लावाल तर शेजारी भारत आहे.

स्पष्ट सांगितले नाही तरी लगेच कळते की भारत सरकारची वक्रदृष्टी आपल्याकडे वळता कामा नये.
लढलेल्या हिंदू समाजाचे अभिनंदन करुन भारत सरकारचे अभिनंदन व हाच भरोसा पुढेही राहू देण्यासाठी भारतात व प्रत्येक राज्यात हिंदू हितवादी सरकारच असले पाहिजे व ही जबाबदारी भारतातील हिंदू समाजावर आहे.

सुनील देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख