Thursday, October 10, 2024

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन

Share

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (Balasaheb Thakre Turmeric Research Center) अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

2019 ते 2024 या काळात हेमंत पाटील हे हिंगोली मतदार संघातून खासदार होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभेची उमेदवारी हेमंत पाटील यांना जाहीर केल्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेकडून मागे घेण्यात आली होती. हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतल्यानंतर ते नाराज होते अशी चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांची नाराजी दूरकेल्याचं बोललं जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख