शासन व्यवस्था अध्यात्मिक मुल्यांकडे लक्ष देत नाही व तसे करण्याचा त्यांचा हेतूही दिसत नाही. भौतिकवादावर लक्ष केंद्रित केल्याने स्वार्थ, लोभ आणि संधीसाधुपणा वाढतो व माणुसकी नष्ट होण्याचा धोका असतो, शिवाय त्यामुळे राष्ट्राला किंवा समाजाला प्राधान्य दिले जात नाही, समाज वा राष्ट्र कधीही शांत नसते म्हणून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीत अध्यत्मिक वैशिष्ट्ये महत्वाची भूमिका बजावतात. आपल्याला हे माहीत आहे, की डॉ.बाबासाहेब हे कट्टर देशभक्त होते,आपल्या विचारांना त्यांनी नेहमीच देखभक्तीच्या चौकटीतच सर्वांसमोर मांडले आणि त्यात कोणतीही तडजोड केली नाही. परंतु बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या आसपास असलेल्या लोकांनी विशेषतः कांग्रेसी मंडळींनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांना आपल्या पद्धतीने जनतेसमोर मांडले आणि दलित समाज हा आपल्यासोबत असावा असा राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न केला. परंतु डॉ आंबेडकरांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले असल्याने उशिरा का होईना आज त्यांच्या एकूणच लिखाणातून त्यांच्याविषयी योग्य माहिती समोर येत आहे,आपण आशा करू शकतो की स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव करून ज्यांना देश तोडायचा होता त्यांचा पराभव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा अभ्यासून,जनतेसमोर आणून आपण सामाजिक सद्भाव वृध्दिंगत करू शकतो. (मूळ विषयासाठी संदर्भ खंड ३ ,बुद्ध वा कार्ल मार्क्स, पान क्र ४६१- ४६२) *हिंदू धर्म हिंदू समाज यांच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते असं सांगणाऱ्या लोकांना वरील पुस्तकाच्या आधारावर चपराक बसते.* चला तर मग * अभ्यासूनी प्रगटावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन.*
श्री.रमाकांत मंत्री
मनमाड