Friday, September 20, 2024

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असून
येत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं जाहीर
केला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी
गतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं.
या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी १२३ गावांच्या आंदोलक समन्वयकांची आज
आंतरवाली इथं बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर
केलं. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी

यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावही जरांगे यांनी यावेळी टीका केली. दरम्यान,
जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत उपोषणाचा
निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती यावेळी केली.

अन्य लेख

संबंधित लेख