Friday, November 29, 2024

अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे राज्यसभेत जया बच्चन रागावल्या

Share

उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी काल राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना “श्रीमती जया अमिताभ बच्चन” असे संबोधले तेव्हा जया बच्चन यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. श्रीमती बच्चन यांनी महिलांना त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वासाठी ओळखले पाहिजे आणि केवळ त्यांच्या पतीच्या नावाचा विस्तार म्हणून नव्हे, असे सांगितले.

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना महिलांना त्यांची स्वतःची ओळख आहे आणि त्यांना केवळ त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जाऊ नये, अशी भूमिका घेतली. उपसभापतींनी त्यांचा उल्लेख “श्रीमती जया अमिताभ बच्चन” असा केला होता,

यानिमित्ताने समाज माध्यमांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. संसदेच्या अधिकृत नोंदीमध्ये जया बच्चन यांचे नाव “जया अमिताभ बच्चन” असेच लिहिले आहे असे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ही माहिती स्वतः जया बच्चन यांनीच संसदेकडे सादर केली आहे. त्यामुळे केवळ माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमती बच्चन यांनी हा कांगावा केला असल्याचे अनेकांचे मत पडले.

जया बच्चन ज्या पक्षाच्या खासदार आहेत त्या समाजवादी पक्षाने जेंव्हा २०१० साली महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडले होते तेंव्हा त्याला प्रखर विरोध केला होता. मात्र बच्चन यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. त्यांची प्रतिक्रिया योग्य होती की केवळ लक्ष वेधून घेणारी होती यावर अनेकांनी मतं मांडली. काहींनी बच्चन यांनीच संसदेला आपले नाव पतीच्या नावासहित दिले असल्याने सभापतींवर आक्षेप घेण्याच्या कृतीवर टीका केली, तर काहींनी महिलांच्या ओळख आणि स्वातंत्र्याबाबतच्या श्रीमती जया बच्चन यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक जगजाहीर आहे. त्यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात राज्याचे टुरिझम अँबेसेडर म्हणून काम केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख