Sunday, November 24, 2024

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Share

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे, आणि सर्वच पक्ष जोरदार तयारीत आहेत. भाजपाने या निवडणुकीत आघाडी घेतली आहे, आणि मोदींच्या नेतृत्वात जोरदार प्रचारासाठी स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली आहे.

भाजपाने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणी यांचा समावेश आहे.

याशिवाय मनोहरलाल खट्टर, जी. किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान, जयराम ठाकूर, डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राम माधव, तरुण चुघ, आशिष सूद, जुगल किशोर शर्मा, जेनब गुलाम अली खटना, डॉ. नरिंदर सिंह, अनुराग ठाकूर, जनरल व्ही. के. सिंह, रविंद्र रैना, अशोक कौल, डॉ. निर्मल. सिंह आणि कविंद्र गुप्ता आदींचाही समावेश आहे.

या स्टार प्रचारकांचा उद्देश जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून घोषित उमेदवारांसाठी प्रचार करणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख