Thursday, October 10, 2024

‘झपाटलेला ३’ चित्रपटात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्या येणार भेटीला…

Share

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारेंच्या ‘झपाटलेला ३’ सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार आहेत. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत याना AI तंत्रज्ञानाच्या मदतीने रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महेश कोठारे यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते म्हणाले,”लक्ष्या माझा जिवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि तो मला मार्गदर्शन करतो असं मला वाटत असतं.. AI चा उपयोग करून मला लक्ष्मीकांत बेर्डेला पुन्हा क्रिएट करायचंय आणि ते मी करणारच. लक्ष्मीकांतला मी स्क्रीनवर पुन्हा एकदा आणणार आहे.”

‘झपाटलेला ३’ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची झलक पाहायला मिळणार असून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीकांत यांची भूमिका रिक्रिएट करण्याचा प्रयत्न महेश यांची टीम करणार आहे. त्यानिमित्तानं मराठी सिनेमात पहिल्यांदाच AIचा वापर करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे. या चित्रपटात ‘तात्या विंचू’ चेही AI रूप दिसणार आहे. ज्यासाठी सिनेमाची टीम तांत्रिकदृष्ट्या सिनेमा आणखी सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे.

हॉलिवूड सिनेमानंतर आता मराठी चित्रपटात AI तंत्रज्ञानाचा वापर होणार…

याआधी हॉलिवूड सिनेमामध्ये AI चा प्रयोग ‘फास्ट अँड फ्युरियस’ सिनेमाच्या सातव्या भागात करण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनेता पॉल वॉकरला रिक्रिएट करण्यात आले. यासाठी पॉलच्या भावाने अभिनय करत त्याच्या चेहऱ्यावर पॉलचे फोटो लावण्यात आले होते. ‘फास्ट अँड फ्युरियस ७’ रिलीज होण्यापूर्वी पॉलचा मृत्यू झाल्याने हा प्रयोग करण्यात आला असल्याने हा प्रयोग करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख