अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत कर्ज घेऊ इच्छुकांसाठी लातूर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहे. लातूर मतदार संघातील कर्ज घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 5 सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवारी हा उद्योजक मेळावा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील उपस्थित राहाणार आहेत, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापति श्री.लालासाहेब देशमुख उपस्थित राहाणार आहेत. खाडगाव रोड बायपास येथील माणिकराव जाधव मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता या मेळाव्याला सुरवात होणार आहे.
लातूर मतदार संघातील मराठा समाजाने मोठ्या संखेने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.