Saturday, February 15, 2025

भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त!

Share

मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र (BJP Maharashtra) प्रदेशच्या वतीने पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली असून, राज्यभरातील १७ जिल्ह्यांसाठी भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हाशः संपर्क मंत्री सूची

  1. गोंदिया – डॉ. पंकज भोयर
  2. बुलढाणा – आकाश फुंडकर
  3. यवतमाळ – ना. अशोक उईके
  4. वाशीम – राधाकृष्ण विखे पाटील
  5. छ. संभाजीनगर – अतुल सावे
  6. बीड – पंकजा मुंडे
  7. धाराशिव – जयकुमार गोरे
  8. हिंगोली – मेघना बोर्डीकर
  9. जळगाव – गिरीश महाजन
  10. नंदुरबार – जयकुमार रावल
  11. मुंबई शहर जिल्हा – मंगलप्रभात लोढा
  12. ठाणे – गणेश नाईक
  13. रायगड – आशिष शेलार
  14. रत्नागिरी – नितेश राणे
  15. सातारा – शिवेंद्र राजे भोसले
  16. कोल्हापूर – माधुरी मिसाळ
  17. पुणे – चंद्रकांत पाटील

अन्य लेख

संबंधित लेख