Sunday, May 26, 2024

कर्नाटकमध्ये काँग्रेस पुरस्कृत लव्ह जिहाद

Share

विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेससला संधी दिल्याबद्दल कर्नाटकातील जनता पस्तावत आहे. लोकसभा निडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असतानाच काॅंग्रेससला एका घटनेमुळे बचवात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे.

कर्नाटकमधील घटनेमुळे कर्नाटकातील प्रभावशाली लिंगायत समाजामधे संतापाची लाट पसरली असून राज्यभर निदर्शने सुरू आहेत. मात्र मुस्लिम मतांसाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कॉँग्रेससकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. किंबहुना काँग्रेसच्या याच धोरणामुळे हिंदू समाजामध्ये, विशेषतः लिंगायत बंधु-भगिनींमध्ये प्रक्षोभ उडाला आहे.

घटना अत्यंत गंभीर आहे. नेहा निरंजन हिरेमठ या महाविद्यालयीन युवतीवर हुबळीमधे एका तरुणाने चाकूने हल्ला केला. ही घटना महाविद्यालयाच्या आवारातच घडली. हल्लेखोर तरुणाचे नाव आहे फैयाज खोंडूनाईक. फैयाजने नेहावर चाकूने अनेकवेळा वार केले आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. भर महाविद्यालमध्ये आणि भरदिवसा ही घटना घडल्यामुळे हुबळीमधे संतापाची लाट उसळली. पोलिसांनी त्यांचे कायदेशीर काम केले परंतु त्यामागील सामाजिक प्रश्नांकडे सरकारने सपशेल कानाडोळा केला.

फैयाज नेहावर एकतर्फी प्रेम करीत होता. नेहाने त्याच्या मवालीगिरीला स्पषट शब्दात नकार दिला होता. हा नकार पचविण्याचा संस्कार फैयाजवर झाला नव्हता आणि त्याने टोकाचे पाऊल उचलून नेहाचा क्रूर रीतीने जीव घेतला. या घटनेला अनेक पैलू आहेत. नेहाचे वडील निरंजन हे काॅंग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते हुबळी महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. या घटनेनंतर निरंजन हिरेमठ अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटक सरकारला दोष देतानाच निरंजन यांनी या प्रसंगाचे वर्णन ‘लव्ह जिहाद’ असेच केले होते. आरोपीचा एन्काऊंटर करावा किंवा त्याला जाहीर फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती, दुर्दैवाने, पक्षाकडूनच दबाव आलयानंतर त्यांनी माफी मागून ही मागणी मागे घेतली. मात्र काही मुस्लिम तरुणांनी फैयाजच्या कृतीचे समर्थन करून त्याचे उदात्तीकरण करण्याचा हिणकस प्रयत्न केला.

या सर्व घटनांचे कर्नाटकात पडसाद उमटणे साहजिक होते. हिंदू समाजाने राज्यभर आंदोलन करून रान उठविले. यामधे लिंगायत समाज आघाडीवर होता. तथापी, काॅंग्रेससने गेंडयाची कातडी पांघरून या घटनेला सर्वसाधारण गुन्हा असेच रूप देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, स्वतःच्या पक्षाच्या नेत्यावर हा प्रसंग आल्यानंतर तरी काँग्रेसने कणखर भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु काॅंग्रेसने आपल्याच नेत्यावर दबाव आणला आणि पुन्हा एकदा मुस्लिम लांगूलचालनाचे अभद्र प्रकटीकरण केले. काॅंग्रेसला हिंदूंच्या भावनांची कदर करावीशी वाटली नाही आणि त्यांनी मुस्लिम आक्रमणाला एका अर्थाने पाठींबाच दिला. निरंजन यांनी अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे मत व्यक्त केले होते. परंतु, काॅंग्रेसला त्याची दाखल घ्यावीशी वाटली नाही. दुसरीकडे फैयाजच्या आईने मुलाच्या कृतीचा निषेध केल्याचे उदात्तीकरण चालू होते. अर्थात याला काॅंग्रेसचा उघड पाठिंबा होता. फैयाजच्या आईने दोघेही प्रेमात असल्याचा दावा करून या घटनेतील गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्नाटकात मुस्लिम अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. काॅंग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर या घटनांमधे लक्षणीय वाढ झाली आहे. राजकीय समर्थनामुळे मुस्लिमांची मग्रुरी वाढली आहे. काॅंग्रेस याकडे संपूर्ण कानाडोळा करीत आहे. काॅंग्रेसला हिंदूंच्या आक्रोशाकडे लक्ष देण्याची गरजच वाटत नाही. लव्ह जिहाद ही एक गंभीर समस्या असल्याचेच काॅंग्रेसला मान्यच नाही, याचा सर्वात मोठा पुरावा काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यातच मिळतो. पक्षाच्या २०२४ च्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, party promises not to interfere with personal choices of food and dress, to love and marry, and to travel and reside in any part of India. All laws and rules that interfere unreasonably with personal freedoms will be repealed.

याचा स्पष्ट अर्थ असाच की काॅंग्रेसला मुस्लिम आक्रमण मान्य आहे. किंबहुना भाजप शासित राज्यांनी या बाबत केलेले कायदे रद्द करण्याचे काॅंग्रेसने सांगितले आहे. काॅंग्रेसच्या या आश्वासनाचा अर्थ असाच निघतो की, पक्षाला लव्ह जिहाद मान्य आहे. लव्ह जिहादचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता किंवा फक्त हिंदूपुरता मर्यादित नाही. देशभरात या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. केरळमध्ये ख्रिश्चन समाजाला या समस्येने भंडावून टाकले आहे. ख्रिश्चन समाजाच्या संघटनांनी काही दिवसांपूर्वी ‘केरळा स्टोरी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करून जागृती करण्याचा प्रयत्न केला होता.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख