Thursday, November 21, 2024

महायुतीची तयारी पूर्ण, विधानसभा निवडणुकीत अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार – चंद्रशेखर बावनकुळे

Share

नागपूर : भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) चे वेळापत्रक अधिकृतपणे घोषित केले. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्र भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद. “विधानसभा निवडणुकीसाठीची आमची तयारी झाली आहे. आमचे सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी आमची संघटना बूथ स्तरावर काम करेल,” असं यावेळी ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार आहे. केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्राला प्रचंड सहकार्य देत असून राज्याच्या आणि जनतेच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा उचलत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी “डबल इंजिन” सरकार अत्यावश्यक आहे.”

तसेच “केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून राज्याचा विकास साधण्यासाठी आम्ही जनतेकडे मतदानाचे आवाहन करणार आहोत. पुढील पाच वर्षे विकासाचे पर्व आणण्यासाठी आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी बूथ स्तरावर आमची संघटना कार्यरत राहणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले .

अन्य लेख

संबंधित लेख