Sunday, July 14, 2024

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून धुवून घेतले पाय!

Share

अकोला: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक काँग्रेस कार्यकर्ता यांचे पाय धुत आहे. अकोल्यात ही घटना घडली असून, पटोले पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.

या व्हिडिओमध्ये नाना पटोले पावसामुळे झालेल्या चिखलातून आपल्या वाहनाकडे चालत गेले त्यामुळे त्यांच्या पायाला चिखल लागला. त्यानंतर पक्षाचा एक कार्यकर्ता त्यांचे पाय धुण्यासाठी पटोले यांच्या वाहनाकडे गेला. पटोले कारमध्ये बसलेले असताना पाय बाहेर काढून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेताना या चित्रफितीमध्ये स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कार्यकर्ता गुडघे जमिनीवर टेकवून पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय हाताने धुताना दिसत आहे.

या घटनेने वादाला तोंड फुटले आहे, समाज माध्यमावर अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवून पटोलेंच्या राजेशाही वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस पक्षात नेत्यांना “राजा” तर कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून पाहिले जाते, असेही मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने अद्याप या प्रकरणी अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

अशा घटनांमुळे वास्तविकतेपासून दुरावल्याचा आणि कार्यकर्त्यांना पुरेसे महत्त्व न दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर होत आहे. काँग्रेस हा वाद कसा हाताळणार आणि त्याचा राज्यातील पक्षाच्या प्रतिमेवर काही परिणाम होणार का, हे पाहायचे आहे.

अन्य लेख

संबंधित लेख