Tuesday, March 10, 2026

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

Share

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागत
विमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती आदींनी त्यांचे स्वागत केले.

लोकभवन येथे मानवंदना
विमानतळावरून नवनियुक्त राज्यपाल थेट ‘लोकभवन’ (राजभवन) कडे रवाना झाले. लोकभवन येथे आगमन होताच महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने त्यांना गार्ड ऑफ ऑनर (मानवंदना) देण्यात आली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आज होणार शपथविधी
नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा आज, १० मार्च २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता लोकभवन येथे अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे. तेलंगणाचे माजी राज्यपाल राहिलेले जिष्णु देव वर्मा आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळतील.

अन्य लेख

संबंधित लेख