राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती msins.inया संकेतस्थळावर देण्यात आली आहे.