Monday, June 24, 2024

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे

Share

महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.  वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सकाळपासून मतदानाचा हक्क बजावत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

माध्यमांशी बोलतांना राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिली.ते म्हणाले, “राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मला असं वाटत तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला आहे असेच तरुण-तरुणी अनेक जण मतदानाला उतरतील” अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. “ज्यांच्या  आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षाच करु नका”

अन्य लेख

संबंधित लेख