मुंबई : संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) भरभरून कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, “जर ही योजना 1947 मध्ये सुरू झाली असती, तर मला दोन वेळेचे जेवण मिळाले असते.” या वक्तव्याने त्यांनी योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. आशा भोसले यांनी ही योजना महिलांच्या स्वावलंबनासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या माध्यमातून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा केले जात आहे.
आशा भोसले यांच्या कौतुकाने या योजनेला नवी ऊर्जा मिळाली आहे. समाजातील अनेक महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी हा पाठिंबा महत्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केल्यानंतर विरोधकांकडून विविध प्रकारच्या आरोपांना सामोरे जावे लागले, पण आशा भोसले यांच्या समर्थनाने या योजनेचे महत्त्व आणखी एकदा समोर आले आहे.
दरम्यान, गायिका आशा भोसले बोलतांना म्हणाल्या कि, या योजनेच्या कौतुकामुळे समाजातील अनेक महिलांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. आशा भोसले यांनी यावेळी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या आठवणी शेअर करताना सांगितले की, “लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जे 1500 रुपये दिले आहेत, त्यामागचा आनंद माझ्यापेक्षा इतर कुणाला कळणार नाही. हेच काम जर 1947 साली कुणी केलं असतं. तर मी दोन वेळचं जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. कारण दुपारी मी जेवत नव्हते. माझे पती सायंकाळी आल्यानंतर आम्ही दोघं मिळून जेवत होतो.” त्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘अभिजात मराठी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा भोसले यांनी लाडकी बहीण योजनेचं भरभरून कौतुक केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
“शिवया ज्या महिलांकडे पैसे नाहीत, त्यांच्यासाठी पंधराशे रुपये फार मोठी रक्कम आहे. महायुती सरकारने त्यांच्यासाठी मोठं काम केलं आहे. मी संगीत क्षेत्रात असले तरी मी एक गृहिणी आहे. एका महिलेला घरात जे काम करावं लागतं, ती सर्व कामं मी करते. घरातलं काम करता करता, मुलांना मोठं केलं. भोसले कुटुंब सांभाळलं. हे करता करता कधी 92 वर्षांची झाले, हे ही कळलं नाही. कधी उपाशी राहून तर कधी जे आहे ते खाऊन दिवस काढले. पण कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. हाच माझा गुरुमंत्र होता,” असे यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या.