लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) आज (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान नागपूर येथे केंद्रिय मंत्री आणि नागपूर (Nagpur) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी, त्यांनी मोठ्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
लोकशाहीचा उत्सव आपण यानिमित्ताने उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक नागरिकाने मतदान करण हे त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सगळ्यांनी मतदान करावं, कोणाला मतदान करावं हे त्यांचा अधिकार आहे. पण, मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. नितीन गडकरी यांच्या विरूद्ध मविआ चे विकास ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.