Saturday, September 7, 2024

लातूर : विरोधकांना प्रधानमंत्री पद देखील हप्त्यात हवे

Share

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यभरात त्यांच्या सभा असून दुपारी लातूरमध्ये (Latur) जाहीर सभा झाली. महायुतीने येथून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shrangare) यांना उमेदवारी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला. ‘शैक्षणिक क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या लातूरकरांचा माझा नमस्कार’, असे म्हणत नरेंद्र मोदी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.

‘ज्या विरोधकांना प्रधानमंत्री पद देखील हप्त्यात हवे आहे. ते मोठे लक्ष साध्य करू शकतील का?’, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. दरवर्षी एक प्रधानमंत्री म्हणजेच पहिल्या वर्षी पहिला, दुसऱ्या वर्षी दुसरा, तिसऱ्या वर्षी तिसरा प्रधानमंत्री असे त्यांचे लक्ष असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

‘मी जेव्हा भारताच्या विकासाची गोष्ट करतो, त्यावेळेस काँग्रेसच्या राजकुमाराला ताप चढतो. मोदी एक भारताचा उल्लेख का करतात? असा प्रश्न ते विचारतात. भारताला विघटित पाहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री पदाला देखील विखंडित करण्याची इच्छा असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधानांची यांची योजना म्हणजे देशाला एका नंतर एकाने लूटल्यासारखे’, असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख