Saturday, January 17, 2026

“जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट

Share

महाराष्ट्र : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. प्राथमिक कल आणि निकालांनुसार, २९ पैकी तब्बल २५ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित झाले आहे. या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राचा ‘महाकौल’ विकासाच्या अजेंड्याला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे,’ असं मोदी यांनी म्हटलं आहे.

विरोधकांना चोख उत्तर आणि कार्यकर्त्यांचा अभिमान
‘महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख