Thursday, October 10, 2024

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण भेट

Share

मुंबई : आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपासंदर्भात पक्षांच्या बैठकाही सुरु झाल्या आहेत. दरम्यान, अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीत दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

राज ठाकरेंनी लोकसभेत महायूतीला पाठींबा दिला होता. मात्र, आता त्यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूका लढवण्याची घोषणा केली आहे. यातच त्यांनी आता मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हि सदिच्छा भेट घेतली असून राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट मध्ये म्हणाले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख