Tuesday, January 28, 2025

नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी!

Share

नांदेड : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतगणना होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यापाठोपाठ रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha By-Election) होणार आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने नुकतंच एक परिपत्रक काढले आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंट वरून पोस्ट केली आहे. काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख