Friday, September 20, 2024

हिंदू जागरणकर्ते: डॉ. केशव बळीराम हेडगेवार

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा २१ जून हा स्मृतिदिन. डॉ. हेडगेवार यांनी संघ ही संघटना बांधली ती त्यांच्या संघटनकौशल्याच्या आधारावर. त्यांचे संघटनकौशल्य थक्क करणारे होते.

भाबडे अनुयायी नसलेला पण भारतावर प्रभाव टाकलेला एकमेव नेता म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार. आज त्यांचा स्मृतिदिवस. हिंदू समाज जागरण आणि दिशादर्शन यासाठी डॉ. हेडगेवार यांनी केलेले कार्य अलौकिक म्हणावे असेच आहे.

डॉ. हेडगेवार हे समाज संघटक असले तरी ते हिंदू समाज संघटक होते. हिंदू शब्द जोडलेला असल्याने व हिंदू समाज व धर्म हे दोघेही अत्यंत क्रूर व विकृत इस्लाम व धूर्त कपटी चर्च या नव्याने ओळख झालेल्या अब्राहामिक पंथांशी बावचळून संघर्षात अडकले असल्याने डॉ. हेडगेवार यांचे समाज चिंतन हे हिंदू धर्म रक्षण चिंतनही मानले गेले. त्या अर्थाने डॉ. हेडगेवार हे हिंदू अथवा सनातन धर्म रक्षक कार्यकर्तेही मानले गेले. असे असतानाही, धर्म संकल्पने जवळ असतानाही त्यांच्या भोवती भक्त नाही तर कार्यकर्ते उभे राहिले हे त्यांचे महानपण आहे. शतकातील ते एकमेवाद्वितीय भारतीय नेते आहेत. कारण धर्म कार्य तरीही भक्त उभे राहू न देता, कार्यप्रवण स्वयंसिद्ध कार्यकर्ते उभे केले असे ते एकमेव नेते भारतीय इतिहासात आहेत.

हे संघटन उभारण्यासाठी व ते संघटन कालोचित लवचिक राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. संघ यशाची कारणमीमांसा एक वाक्यात करायची झाली तर ते हेच असेल की या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती डॉ. हेडगेवार या ध्येयानेच केली होती न की डॉ. हेडगेवार या देहाने.

डॉ. हेडगेवार यांनी व्यक्तिनिरपेक्ष संघटन स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विलोपाने उभारले असल्याने तोच आदर्श साऱ्या संघटनेने घेतला. संघटनेचे हे महानपण. दुसरे महान कार्य म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये कधीच संघटनाभिनिवेष निर्माण होऊ दिला नाही. या दोन कृतींमुळे डॉ. हेडगेवार हे शतकातील एकमेवाद्वितीय नेते ठरतात.

वास्तविक त्यांची प्रत्येक कृती ही विश्लेषण केली पाहिजे एवढी महान आहे. ते इतरत्रही येईल. म्हणून अनुयायी नाही तर कार्यकर्ते उभे केले व संघटना उभारूनही अभिनिवेश येऊ दिला नाही, हे अन्य कोणत्याही नेत्यात न दिसलेल्या दोन दिशादर्शक गुणांचाच उल्लेख करून थांबतो.

सुनील देशपांडे
(लेखक ब्लॉगर असून ते विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख