Tuesday, September 17, 2024

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

Share

पुणे, 2 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमाकरिता ‘क्युएस वर्ल्ड रॅंकिंग’च्या क्रमवारीत दोनशेच्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

अशा आहेत अटी व शर्ती

✅ लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व भारतीय नागरिक असावा.

✅ विद्यार्थ्यांला परदेशातील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रॅकींग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.

✅ विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र सरकारची परदेशी शिष्यवृती घेतलेली नसावी, तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

✅ परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

✅ एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व योजनेसाठी पात्र असणार नाही.

अन्य लेख

संबंधित लेख