Friday, December 27, 2024

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान

Share

पत्रकारितेतील पावित्र्य हे लोकमान्य टिळकांसारखे असावे लागते, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोघांचेही महत्त्व लोकशाहीत खूप जास्त आहे. एकीकडे साक्षरता व माध्यमे वाढत आहेत परंतु विश्वासहार्यता वाढत आहे का? हे बघणे खूप आवश्यक आहे. पत्रकारिता करताना कायम समाजभान असायला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले. नवजीवन विद्यालय साकोली येथे वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात व महाराष्ट्र माझा या विशेष व्याख्यान सोहळ्यात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. पत्राकारांसोबत साकोली मतदार संघातील अनेक सामान्य नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जगद्‌गुरू सेवा संप्रदाय सेवा समितीचे साकोली तालुका अध्यक्ष के.डी.लांजीवार उपस्थित होते. साकोली विधानसभा क्षेत्रात असलेल्या लाखनी साकोली आणि लाखांदूर या तालुक्यातील पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक करताना डॉक्टर सोमदत्त करंजेकर म्हणाले की कायमच दुसऱ्यासाठी जगणाऱ्या पत्रकारांच्या कामाचा कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून हा सन्मान सोहळा ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. या प्रसंगी सर्व पत्रकरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख