Wednesday, December 4, 2024

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

Share

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या अभूतपूर्व गोंधळा मुळे संजय राऊतांनी हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या वेळी ही जागा शिवसेनेला देण्यात आली असती तर महाविकास आघाडीच्या हितासाठी ती अधिकउपयुक्त झाली असती, असे राऊत यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेसाठी पारंपरिक असून २००९ आणि २०१४ साली या मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजपने बंडखोर उमेदवार उभा केल्यामुळे शिवसेनेचा आमदार पराभूत झाला आणि काँग्रेसला या जागेचा फायदा झाला. यंदाच्या निवडणुकीतही, राऊत यांच्या मते, ही जागा शिवसेनेकडेच आली असती तर रविकिरण इंगवले किंवा संजय पवार यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळाला असता.

राऊत यांनी राजकीय पक्षांच्या आंतर्गत गटबाजी आणि जागावाटपाच्या निर्णयांवर टीका करताना सांगितले की, काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडले हे दुर्दैवी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा शिवसेनेला मिळाली असती तर ती महाविकास आघाडीला स्थिर करण्यात मदत झाली असती.

महाविकास आघाडीमधील पक्षांच्या आंतर्गत समन्वयाचा अभाव त्यांच्या निवडणूक रणनीतीवर परिणाम करतो का. हा प्रश्न आता मतदारसंघाच्या भविष्याबद्दल आणि आघाडीच्या एकतेबद्दल विचार करण्यास भाग पाडत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख