Saturday, July 27, 2024

रामलल्ला रंगले होळीच्या रंगात

Share

अयोध्येतील श्रीराममंदिरात यंदा होळी साजरी झाल्यामुळे अयोध्येत सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. श्रीरामनगरीतील यंदाची ही होळी खूपच विशेष होती. प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहिलीच होळी असल्याने अयोध्येत आनंदाचे वातावरण होते. विविध ठिकाणांहून आलेल्या रामभक्तांनी मंदिरात रंग आणि गुलाल उधळला. होळीच्या दिवशी झालेल्या या उत्सवामुळे भाविक आनंदी झाले होते. संपूर्ण रामजन्मभूमीचा परिसर रंगांच्या सणाच्या आनंदात दंग झाला होता.

राम मंदिरातील पुजाऱ्यांनी मूर्तीवर पुष्पवृष्टी केली आणि होळी खेळली. यासोबतच भोग आणि अलंकाराचा भाग म्हणून अबीर-गुलाल देवाला अर्पण करण्यात आला. देवाला ५६ प्रकारचा नैवैद्य दाखवण्यात आला. रामललासाठी पुजाऱ्यांनी भाविकांसह होळीची गाणी गायली. त्याचवेळी रामजन्मभूमी संकुलात रामललाच्या दर्शनासाठी आलेले भाविकही होळीच्या गाण्यांवर नाचत होते. पुजाऱ्यांनी भाविकांवर फुलांचा वर्षाव केला आणि फुलांनी होळी खेळली.

रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, रामललांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिली होळी साजरी केली जात आहे. रामललाच्या आकर्षक मूर्तीला फुलांनी सजवण्यात आले असून कपाळावर गुलाल लावण्यात आला आहे. यावेळी रामललाच्या मूर्तीने गुलाबी वस्त्र परिधान केले होते. मोठ्या संख्येने भाविक रामललाच्या दरबारात पोहोचले आणि आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन धन्य झाले. रामललाच्या होळीसाठी मंदिराकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख