Friday, December 27, 2024

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल

Share

मुंबई : शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून, शेतकरी, आडते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधत त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पणन विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी आढावा बैठकीत दिल्या.

मंत्री रावल यांनी मुंबई येथील सहयाद्री अतिथिगृह येथे पणन विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र कृषी व पणन महामंडळाचे व्यवसथापकिय संचालक संजय कदम, पणन संचालक विकास रसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खंडागळे यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री रावल म्हणाले की, सर्व अधिका-यांनी शेतक-यांसाठी सदहेतूने काम करून शेतमालाचे योग्य तऱ्हेने मार्केटींग व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा. अधिका-यांनी संवेदनशिलपणे कामकाज करावे याकरीता कृती आराखडा तयार करावा.कृषी उत्पन्न बाजार समित्या या पणन विभागाचे महत्वाचे अंग आहे, त्यादृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पुरक बदल कसे करता येतील याबाबत चर्चा केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही दररोज कोटयावधींची उलाढाल करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे त्यादृष्टीने त्याठिकाणी आवश्यक सुधारणा व बळकटीकरण कसे करता येईल याबाबत चर्चा केली. पणन विभागामध्ये मार्केटींग साठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकिया व कार्यपध्दती राबवण्यावर भर दयावा शेतमालाची साठवणूक वाहतुक व विक्री यासाठी आधुनिक पध्दतीचे तंत्रज्ञान वापरले पाहिजे त्यादृष्टीने पणन विभागाकडून नियोजन करण्यात यावे.

यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ, पुणे; पणन संचालक आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला

अन्य लेख

संबंधित लेख