Saturday, October 12, 2024

Bacchu Kadu: तिसऱ्या आघाडीला एआयएमआयएम नको – बच्चू कडू

Share

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. आघाडी आणि युतीमध्ये बैठकाहोत आहेत. त्यातच आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्नही केला जात आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याकडूनतिसऱ्या आघाडीची स्थापना कऱण्यात येणार आहे. पण या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडूयांनी एआयएमआयएमला घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच तिसऱ्याआघाडीसंदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि अन्य नेत्यांची महत्त्वाचीबैठक होणार आहे.

एआय एमआयएम अथवा धार्मिक प्रखरता असणाऱ्यांनासोबत घेणारनाही. आमची लढाई जाती धर्मापलीकडे आहे. एमआयएमची प्रखरता पचवणं आम्हाला शक्यनाही. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार असल्याचे बच्चू कडूयांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख