Friday, December 27, 2024

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Share

मुंबई : राज्यात २७ आणि २८ डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या हवामान बदलांच्या अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांनीही हवामानाच्या बदलांप्रमाणे आपली दिनचर्या नियोजित करावी, विशेषत: प्रवास करणाऱ्यांनी पावसाचा अंदाज आणि वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात ठेवून प्रवासाचे नियोजन करावे.

अन्य लेख

संबंधित लेख