Wednesday, April 2, 2025

नागपूरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चेला उधाण

Share

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल नागपूरमध्ये (Nagpur) महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या अलीकडील राजकीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद झाला आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते. याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची ठरली असून, अनेक चर्चांना उधाण आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख