Wednesday, November 13, 2024

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली

Share

राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धव
ठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतला
कारभार अशाच बेदिलीचे उदाहरण होता. त्याची झळ महाराष्ट्राला कशी बसली याची
काही ठळक उदाहरणे:-
 उद्धव ठाकरेंनी त्यापूर्वीच्या देवेंद्र फडणविसांच्या सरकारने घेतलेले जनहिताचे
जवळपास सर्व निर्णय फिरवले. त्यामुळे मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो असे सर्व
प्रकल्प लांबले.
 जलयुक्त शिवारसारख्या कल्याणकारी योजना बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले.
 अतिवृष्टी, पूर, तसेच निसर्ग, तौत्के, बिपरजॉय चक्रीवादळांचा मोठा फटका या काळात
राज्याला बसला पण आपदाग्रस्त लोकांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत
राहिल्या.
 लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या उद्योगधंद्यांना कोणताच दिलासा न मिळाल्याने
अनेक छोटे आणि मध्यम उद्योगधंदे बंद पडले आणि तरूणांवर बेरोजगारीची पाळी
आली.
 कोव्हिड साथीमुळे बेजार झालेल्या वैद्यकीय सेवा क्षेत्राला राज्य सरकारकडून कोणतेही
सहाय्य न मिळाल्यामुळे रुग्णांना नीट उपचार मिळू शकले नाहीत आणि परिणामी
कडक लॉकडाऊन पाळूनही साथीला बळी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढत गेली.
राज्यातले हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

आता पुन्हा अशीच बेदिली होऊ नये यासाठी आपण मतदारांनी सजग बनून महायुतीला
विजयी करणे ही आज काळाची गरज आहे. हे करण्यात आपण हयगय केली तर महाराष्ट्रात
पुन्हा अनागोंदी माजेल आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल.

अन्य लेख

संबंधित लेख