Sunday, November 24, 2024

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस

Share

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भोवतीअर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचेराहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली.एका विशेषमुलाखतीमध्‍ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता राहुल गांधी यांची विचारसरणीकाँग्रेसची राहिलेली नाही. ते आता डाव्‍या अतिरेकी विचारसणीचे झाले आहे. भारतीयसंविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्‍हरमध्‍ये असते. राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगातीलच कव्‍हर घातलेलीच का दाखवतात..? त्‍यांची लोकशाही मूल्‍ये पोकळ आहेत. नागपूर येथे राहुल गांधी यांच्‍यासंविधान कार्यक्रमावेळी माध्‍यम प्रतिनिधींच्‍या उपस्‍थितीवर बंदी घालण्‍यात आलहोती. ते गुप्‍त बैठकाचे आयोजन करत लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असणार्‍या माध्‍यमांनात्‍या बैठकांपासून लांब ठेवतात, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

राहुल गांधींचीभारत जोडो यात्रा ही एक विधायक पाऊल आहे, असे आम्‍हाला प्रथम वाटले होते. मात्र त्‍यांच्‍यायात्रेत सहभागी झालेल्‍या 180 संघटना विध्‍वंसक कृत्‍यात सहभागी असणार्‍या होत्‍या.त्‍याची नोंदही आहे. राहुल एका हातात संविधान असल्‍याचे सांगतात आणि आपल्याकृत्यांमधून अराजकतेचा प्रचार करतात. राज्यघटना हा एक आदेश आहे, अराजकता हीअव्यवस्था आहे. म्हणूनच त्यांच्या कायद्याची प्रत लाल रंगाची आहे. ते लोकशाहीबचावाच्‍या केवळ पोकळ गप्पा मारतात,पण लोकशाहीचा चौथा स्तंभ, प्रसारमाध्यमे यांनासंविधानावरील बैठकीपासून दूर ठेवतात. राहुल गांधी यांचा मुखवटा आता उतरला जात आहे, अशी टीकाही फडणवीसयांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करत नाही.पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अराजक शक्ती आणि मतासाठी वापरल्‍याजाणार्‍या धर्मांध शक्‍तीचा जिहादींचा मुकाबला करण्यासाठी आम्ही संघ परिवाराची मदतघेतली. मी नेहमीच संघ आणि परिवारातील संघटनांकडूनमार्गदर्शन घेतो. आमचा लढा काँग्रेसशी नसून काँग्रेसमध्ये शिरलेल्या अराजकतावादीआणि देशविरोधी शक्तींशी आम्ही लढत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.महायुती सरकारनेसुरु केलेली लाडकी बहिण योजना ही गेम चेंजर ठरेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत या योजनेमुळेमहिलांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. आमच्या सरकारने विकास प्रकल्प अत्‍यंतजलदगतीने राबवले.

आम्‍ही आश्‍वासनांची पूर्तता केली हे राज्‍यातील जनतेने पाहिलेआहे. आम्ही वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प सारखे प्रकल्प पुन्हा सुरू केलेज्यामुळे विदर्भाचे नशीब बदलेल आणि वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे 54-टीएमसीसमुद्राचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. जगातील सर्वात मोठ्याबंदरांपैकी एक असणाऱ्या वाढवान सागरी बंदराचे कामही महायुती सरकारने सुरू केलेआहे. आम्‍ही केलेले विकास जनतेसमोर आहे. सध्या लोकांमध्ये महायुतीसाठी सकारात्मकताअसल्याचे फडणवीस म्हणाले.काँग्रेसच्यानेतृत्वाखालील इंडि आघाडीने 2 फेक नरेटीव्‍ह पसरवले. यामध्‍ये पहिले होते भारतीयराज्यघटना धोक्यात होती, आरक्षण संपुष्टात येईल आणि दुसरे होते ‘व्होट जिहाद’. आता भारतीय राज्‍यघटनाधोक्‍यात आहे या खोट्या प्रचाराच भंडाफोड झाला आहे. कारण राहुल गांधी यांनी स्‍वत:चअमेरिकेत जावून भारतातील आरक्षण संपवले पाहिजे, असे सांगितले. आरक्षण संपवण्याबाबतअमेरिकेतील त्यांच्या विधानाने सारे काही स्‍पष्‍ट झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्‍या वक्तव्याचे समर्थन केले.

काँग्रेसने ‘व्होटजिहाद’चा वापर करत समाजाचे ध्रुवीकरण केले. भाजपच्या विरोधात मतदान करण्यासाठीफतवे काढण्यात आले आणि लोकांना शपथ देण्यात आली. आता अल्पसंख्याकांना समजले आहे कीत्यांची दिशाभूल केली गेली. त्यांचा वापर केला गेला, असे फडणवीस यांनी सांगितले.‘व्होट जिहाद’मुळेलोकसभा निवडणुकीत आम्ही10 जागा गमावल्या. धुळ्यात सहा विधानसभा मतदारसंघांपैकीआम्ही 1.9 लाख मतांनी पुढे होतो; पण मालेगावमध्ये 1.94 लाख मते मिळाली. आमचाअवघ्या 4 हजार मतांनी पराभव झाला. या निकालानंतर ‘व्होट जिहाद’च्या माध्यमातूननिवडणुका जिंकल्या.अल्पसंख्याक तुष्टीकरणाला वरचढ ठरेल, असे संघ शाखा, विश्व हिंदूपरिषदेला वाटले. हिंदुत्ववादी संघटनेने आम्हाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही अल्पसंख्याकांच्या विरोधात नसून तुष्टीकरणाच्या विरोधात असल्याचे फडणवीसयांनी सांगितलेखंडणी प्रकरणी अनिलदेशमुखांना अटक झाली. आता या प्रकरणी त्‍यांना जामीन मिळून दोन वर्षांचा कालावधीझाला आहे. ते आता विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर अचानक माझ्याविरुद्ध बोलायलालागले आहेत. त्‍यांनी एका पुस्‍तकही प्रकाशित केले आहे. त्यांनी पुस्तकात आरोपसिद्ध केलेले नाहीत. त्‍यांचे सर्व आरोप काल्‍पनिक आहेत. महाविकास आघाडी सरकारसत्तेत असताना नोव्हेंबर 2021 मध्‍ये अनिल देशमुख तुरुंगात गेले. त्‍यावेळी सरकारत्‍यांचेच होते; त्यांचेच सरकार सत्तेवर असताना त्यांना कोण त्रासदेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावे,असे आव्‍हानही फडणवीस यांनी दिले.

सर्वोच्चन्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांमध्ये त्यांच्या विरोधात असणार्‍या पुराव्यांचाउल्लेख आहे. न्‍यायालयाने त्‍यांना प्रकृतीच्या जामिनावर सोडले आहे. त्‍यांचीनिर्दोष मुक्‍तता करण्‍यात आलेली नाही. आता कोणीतरी त्‍यांना माझ्‍यावर टीका करण्‍याचेआदेश दिले. त्‍यानुसार हे काल्‍पनिक आरोप करत आहेत. त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिममतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा होती, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख