Wednesday, December 4, 2024

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत

Share

पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत.

कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले. मोकळ्या झालेल्या या जागेचा फायदा घेत एका मुस्लिम व्यक्तीने ती जागा वक्फची मालमत्ता असल्याचा न्यायालयीन दावा केला आहे. प्रकरण वक्फ बोर्डात असल्याने ना तिथे पुर्नविकास झाला, ना स्थलांतरीतांना भाडे मिळाले. वक्फ कायद्यामुळे तेथील १३५ कुटुंबे आज बेघर झाली असून, अनेकांच्या जीवीताचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पुण्येश्वर मंदिराजवळील सर्वे क्रमांक १२७७-७८ या जागेत १९६० च्या दशकांपासून अनेक कुटुंबे राहत आहे. ही झोपडपट्टी आता पुनर्विकासासाठी गेली आहे. रिक्षा चालवत उदरनिर्वाह करणारे मोहम्मद अनिफ शेख सांगतात, इथल्या झोपडपट्टीत माझा जन्म झाला, इथल्या घरांमध्ये मी लहानाचा मोठा झालो. तेंव्हा मदतीला कोणी आले नाही. आज मात्र पुनर्वसनासाठी घरं पाडली गेली, तेंव्हा मात्र जागेवर दावा करण्यासाठी वक्फ बोर्ड आले आहे. आमच्यातीलच एका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी वक्फबोर्डात हा दावा केला आहे. आम्हाला नवी घरे नकोत पण आमची जागा परत मिळावी. एवढीच मागणी आहे.” पहिल्या वर्षी विकसकांनी घराचे भाडे दिले. मात्र जागेचे प्रकरण वक्फ बोर्डात गेल्याने त्यांनी आता हात काढता घेतला असून, बेघर कुटुंबांवर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे, अशी टोकाची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. शेजारी असलेल्या दर्ग्याचा फायदा घेत ही जागा वक्फची असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दर्गा ट्रस्टचे पदाधिकारीही वक्फच्या कायद्यामुळे भरडले जात आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या सर्वांकडे दाद मागितली मात्र वक्फ बोर्डामुळे सर्वच लोक मुग गिळून बसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

शेजारी दर्गा होता म्हणून केला दावा..
झोपडपट्टी शेजारी दर्गा असल्याने ही जमिन सुद्धा वक्फ बोर्डाची आहे, असा अजब दावा या प्रकरणात करण्यात आला आहे. दर्ग्यासाठी वजूखाना हवा म्हणून या इसमाने जागेवर वक्फ बोर्डाचा दावा करत १४० कुटुंबांना बेघर केल्याचे स्थानिकांनी सांगितले. गांभिर्याची बाब म्हणजे यात सर्वसामान्य मुस्लिम परिवारही बेघर झाले आहे.

वक्फची संपत्ती म्हणजे काय?
वक्फचा अर्थ आहे अल्लाच्या नावे. म्हणजे अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाही. तीन प्रकारे संपत्ती वक्फच्या नावे होऊ शकते. जर कोणी केली किंवा कोणी मुस्लीम अथवा मुस्लीम संस्थेची जमीन दीर्घकाळापासून वापरली जात असेल, तर ती वक्फच्या नावे होते. वक्फ बोर्ड हे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करते. ही कायदेशीर संस्था आहे. प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डामध्ये मालमत्तांची नोंदणी करणं बंधनकारक आहे. हे बोर्ड मालमत्तांची नोंदणी, व्यवस्थापन आणि संवर्धन करते. राज्यांमध्ये बोर्डाचं नेतृत्व त्याचे अध्यक्ष करतात. देशात शिया आणि सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत.

हिंदू-मुस्लिम सर्व समाजाचे लोक इथे कित्येक वर्षांपासून राहतात. आमचे घर पाडल्यानंतर जागेची केस वक्फ बोर्डात का नेण्यात आली. इथं सर्व हातावर पोट भरणारे लोक आहेत. बेघर झाल्यामुळे तर अनेकांना तणावामुळे आजार जडले. एका व्यक्तीचा तर इथे साप चावून मृत्यू झाला.
-अबू सय्यद, वय ८०

आमच्यात धर्मावरून काही वाद नाही. उलट इथला दर्गा वाचविण्यासाठी हिंदू भोई सामाजानेच पुढाकार घेतला होता. आमच्या जागेच्या बाहेर दर्गा आहे. त्याचा इथ काहीही संबंध नाही. मात्र, त्याचाच फायदा घेत या मुस्लिम इसमाने केस वक्फ बोर्डाकडे नेली. या जागेत १०० स्क्वेअर फुटाचा वजुखाना बांधावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आजवर आमची घरे होते तेंव्हा वक्फबोर्ड वाले आले नाही. जागा रिकामे झाल्यावरच वक्फबोर्ड का आले.
-सुषमा गुजर

आम्ही घरात दोघेच होतो. पण वक्फ बोर्ड प्रकरणाचे टेंशन घेऊन माझे पती दोन महिन्यांपूर्वी वारले. आता मी एकटीच राहिली असून, माझा संभाळ कोण करणार, मी जायचे कोठे, आसा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. आम्हाला जगण्यातूनच उठविण्यात आले आहे.
-मुमताज गुलाब शेख, वय ८० पेक्षा जास्त

माहितीसाठी स्थानिक रहिवाशाचा नंबर –
राजेंद्र तिकोणे – 9325411411

सोबत कागदपत्रांची पिडीएफ

अन्य लेख

संबंधित लेख