Monday, October 7, 2024

CNG BIKE|बजाज ने आणली जगातली पहिली सीएनजी बाईक. किंमत, मायलेज व वैशिष्ट्ये जाणून घ्या

Share

बजाज ऑटोने आज जगातील पहिली CNG वर चालणारी बाईक Bajaj freedom 125 लॉन्च केली आहे.
याने पेट्रोलच्या वाढत्या किमतीने त्रस्त झालेल्या दुचाकी स्वारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीमुळे बाजारात सीएनजी गाड्यांची मागणी वाढत आहे. त्यातच बजाज कडून जगातील पहिली सीएनजी (CNG) बाईक आज पिंपरी चिंचवड येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली आहे

बजाज ऑटोने कंप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालणारी जगातील पहिली मोटारसायकल फ्रीडम 125 सादर केली आहे. ह्या गाडीची एक विशेष बाब म्हणजे ही 125 cc कम्युटर बाईक पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालते. या बाइक ची किंमत ₹ 95,000 आणि ₹ 1.10 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान असणार आहे. तसेच फ्रीडम 125 चे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.

फ्रीडम 125 च्या मदतीने इंधन कपात 50 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो असा बजाज ऑटो चा दावा आहे .लहान पेट्रोल टाकी आणि CNG सिलेंडरने सुसज्ज आहे. ही मोटरसायकल स्वारांना हँडलबार वर असलेल्या स्विच वापरून इंधनाच्या प्रकारांमध्ये बदल करण्याची संधी देते.

मोटारसायकलमध्ये सीएनजी आणि पेट्रोलसाठी वेगळे फिलर नोझल्स आहेत, जे त्यांच्या वेगळ्या स्टोरेज आवश्यकता पूर्ण करतात. पेट्रोल टाकी 2 लिटर ची आहे तर सीएनजी टाकीची क्षमता 2 किलो आहे.

बजाजने असा दावा करते की फ्रीडम 125 केवळ सीएनजीवर 213 किमी पर्यंत कव्हर करू शकते व पेट्रोल टाकीद्वारे 117 किमी अंतर कव्हर करू शकतात म्हणजे एकूण ही मोटारसायकल 330 किमी ची रेंज देते. CNG साठी 102 km/kg आणि पेट्रोलसाठी 64 km/l अशी माइलेज या गाडीचा आहे.

125 सीसी सिंगल-सिलेंडर, इंधन इंजेक्शनसह एअर-कूल्ड इंजिन.
फ्रीडम 125 9.4 bhp आणि 9.7 Nm टॉर्क प्रदान करते.
पुढील ब्रेक हे डीस ब्रेक असून मागील ब्रेक हे ड्रम ब्रेक्स आहेत. ही गाडी 17-इंच अलॉय व्हीलवर चालते.

फ्रीडम 125 मध्ये गोल DRL हेडलाइट आहेत. बाइकच्या डिझाइनमध्ये राइडिंग पोझिशनसाठी फ्लॅट सीट, रुंद हँडलबार समाविष्ट आहेत. सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सीएनजी कमी असल्यास त्याचे संकेत देते.

या बाईकच्या लॉन्चिंग सोहळ्या दरम्यान केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनी बजाज टीमचे अभिनंदन करत ही बाईक एक लाख रुपये पेक्षा कमी असावी जेणेकरून ही बाइक अधिकाधिक लोकांना विकत घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली

अन्य लेख

संबंधित लेख