Wednesday, January 7, 2026

“मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

Share

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची त्रिसूत्री: विकास, आशा आणि स्थैर्य
केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टद्वारे महायुती आणि भाजपची बाजू मांडताना तीन मुख्य तुलनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत:

▪️विकास विरूध्द भकासः
या निवडणूक आहेत, आपण भाजपाच्या, देवेंद्रजीच्या विकासाच्या संकल्पासोबत आहात की प्रत्येक गोष्टीला विरोध करणाऱ्या भकास कॉंग्रेसला मदत करणार हे ठरविणाऱ्या…

▪️आशा विरूध्द निराशाः
राज्यातील विविध प्रश्नांवर उत्तरे शोधत जिद्दीने महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या देवेंद्रजी सोबत रहायचं की सतत पक्ष चोरला, हे चोरला ते पळवल या निराशावादी उबाठा सोबत रहाणार, हे ठरविणाऱ्या…

▪️स्थैर्य विरुद्ध अराजकः
राज्याला, देशाला स्थैर्य देत विकासाभिमुख भाजपाला
निवडायचं की सगळी कडे अराजकता निर्माण करणाऱ्या मविआला निवडायचं हे ठरविणाऱ्या…

“जनता भाजपलाच निवडेल!”
शेवटी, विकास, आशा आणि स्थैर्य हेच भाजपचे महत्त्वाचे मुद्दे असून जनता या सकारात्मक राजकारणालाच पाठिंबा देईल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. “प्रत्येक मत हे देशाच्या हितासाठी असावे, कोणाप्रती असलेल्या द्वेषासाठी नाही,” हा संदेश त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख