गंगाखेड : जिल्हा रक्तपेढी ची गरज ओळखून प्रतिवर्षा प्रमाणे बुध्द पोर्णिमेचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS Gangakhed) व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड (Gangakhed) यांच्या वतीने या वर्षीही रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन केले आहे. दिनांक २३ मे, गुरूवार,रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत गीता भवन, डॉक्टर लेन, गंगाखेड येथे हे शिबिर चालेल.
सामाजिक बांधिलकी ठेवून चळवळीत भाग घेऊन रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. आपण केलेल्या रक्तदाना मुळे निश्चितच एका गरजवंत रुग्णाला जीवदान मिळू शकते. हे आपल्या सर्वांचे सामाजिक कर्तव्य व जबाबदारी सुद्धा आहे. आपल्या शरिरात साधारणपणे 5 ते 7 लिटर रक्त असते. 350 मि.ली एवढेच रक्त घेतले जाते. त्या अवघ्या 24 ते 48 तासांत शरिरात रक्तनिर्मिती होते. रक्तदानामुळे आपल्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते. यामुळे बरेचसे आजार पहिल्याच पायरीवर कळण्यास मदत होते. तरी सर्वांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड’तर्फे करण्यात आले आहे.